एमआयएमकडून देशी दारू दुकानात तोडफोड आणि जाळपोळ

By Admin | Updated: April 24, 2017 17:32 IST2017-04-24T16:06:45+5:302017-04-24T17:32:38+5:30

शहागंज आणि चेलीपुरा येथील देशी दारू दुकानांवर एमआयएमने सोमवारी हल्लाबोल करीत दुकानातील साहित्याची तोडफोड

MIM smugglers and arson in country liquor shops | एमआयएमकडून देशी दारू दुकानात तोडफोड आणि जाळपोळ

एमआयएमकडून देशी दारू दुकानात तोडफोड आणि जाळपोळ

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद,  दि. 24 - शहागंज आणि चेलीपुरा येथील देशी दारू दुकानांवर एमआयएमने सोमवारी हल्लाबोल करीत दुकानातील साहित्याची तोडफोड करीत जाळपोळ केली. यावेळी मद्यपींना चांगलाच चोप देण्यात आला.हे आंदोलन सोमवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडले. याप्रकरणी आ. इम्तियाज जलील, तीन नगरसेवकांसह १९ जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याविषयी अधिक माहिती अशी की, शहागंज येथील पाण्याच्या टाकीजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. दोन भावांच्या वादात हे दुकान अनेक दिवसापासून बंद होते. दरम्यान तीन दिवसापूर्वी हे दुकान पुन्हा सुरू झाले. याविषयीची माहिती मिळताच नगरसेविका सायराबानो यांनी हे दुकान सुरू करण्यास विरोध असल्याचे सिटीचौक पोलिसांना कळविले होते. त्यावेळी सरकारमान्य दुकान बंद करता येत नसल्याचे पोलिसांनी सायराबानो यांना सांगितले होते. दरम्यान आ. जलील आणि हे कार्यकर्त्यांसह सोमवारी सकाळी साडअकरा वाजेच्या सुमारास या दुकानासमोर निदर्शने करण्यासाठी गेले. याविषयीची पूर्व कल्पना असल्याने सहायक पोलीस आयुक्त रविकांत बुवा, पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे आणि कर्मचारी तेथे उपस्थित होते.

Web Title: MIM smugglers and arson in country liquor shops