शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लाखो वाहनांच्या तपासणीचा भार दोघांवर : आरटीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:39 IST

योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत.

ठळक मुद्देवाहन तपासणी मोहिमेवर प्रश्नचिन्हलाखो वाहनांसाठी दोन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश असलेल्या एकाच पथकावर वाहनांची संख्या विचारात घेता त्यांच्या तपासणीसाठी अधिक पथकांची गरज धावण्यास योग्य नसलेल्या वाहनांचा शोध घेणे या पथकासाठी आव्हानात्मक

पुणे : योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सोमवार (दि. ८) पासून सुरू करण्यात आली. मात्र, लाखो वाहनांसाठी दोन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश असलेल्या एकाच पथकावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने कार्यालयावर ही वेळ आली असून मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत. वाहनांची तपासणी काटेकोरपणे न केल्याने काही दिवसांपुर्वी शासनाने ३७ वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सर्वाधिक १३ निरीक्षकांचा समावेश होता. याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परिवहन विभागाने वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे आरटीओकडून सोमवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत दोन वाहन निरीक्षकांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.पुणे जिल्ह्यात सर्वप्रकारच्या एकुण वाहनांची संख्या ३६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने माल व प्रवासी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. पण जिल्ह्यातील या वाहनांची संख्या विचारात घेता त्यांच्या तपासणीसाठी अधिक पथकांची गरज आहे. पण मनुष्यबळाअभावी केवळ एकच पथक नेमण्यात आले आहे. दिवे येथील टेस्ट ट्रॅक, दैनंदिन परवानाचे काम यांसह अन्य कामांसाठी केवळ ३७ निरीक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे तपासणी मोहिमेसाठी आणखी निरीक्षक दिल्यास दैनंदिन कामकाज आणखी कोलमडू शकते. त्यामुळे एकच पथक नेमण्याची वेळ कार्यालयावर आली आहे. संपुर्ण शहरात फिरून रस्त्यावर धावण्यास योग्य नसलेल्या वाहनांचा शोध घेणे या पथकासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे दि. २३ आॅक्टोबरपर्यंत हे पथक किती वाहनांची तपासणी करणार, हा प्रश्नच आहे.  

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर