मुंबई : मालवणीत शाळेबाहेरील परिसरात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त करण्यात आले आहे. आदिल शेख, इम्रान सय्यद आणि नासीर लाखानी अशी अटक आरोपींची नावे आहेत. मालाडच्या मार्वे रोडवरील डिवाईन शाळेसमोर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी या परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या हेरॉईनची बाजारातील किंमत अंदाजे २ लाख ७६ हजार रुपये आहे. (प्रतिनिधी)
शाळेसमोरून लाखोंचे ‘हेरॉईन’ हस्तगत !
By admin | Updated: April 29, 2017 03:06 IST