100 वर्षांच्या महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक
By Admin | Updated: April 16, 2016 13:34 IST2016-04-16T13:34:14+5:302016-04-16T13:34:14+5:30
शंभर वर्षाच्या वृद्ध महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण पोलीसांनी 18 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.

100 वर्षांच्या महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शंभर वर्षाच्या वृद्ध महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण पोलीसांनी 18 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. बुधवारी हा प्रकार घडला होता. पहाटेच्या वेळी ही महिला घरी झोपली असताना, त्याच परीसरात राहणारा अक्षय बोराडे हा तरूण तिच्या घरात घुसला आणि त्याने या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.
या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज शनिवारी त्याला अटक करण्यात आल्याचे पीटीआयने म्हटले आहे.