गिरणी कामगार ‘बेघर’च; आश्वासनावरच बोळवण
By Admin | Updated: February 13, 2015 02:00 IST2015-02-13T02:00:47+5:302015-02-13T02:00:47+5:30
बृहन्मुंबईतील १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना घरे देण्याची गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवणे

गिरणी कामगार ‘बेघर’च; आश्वासनावरच बोळवण
संदीप प्रधान, मुंबई
बृहन्मुंबईतील १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना घरे देण्याची गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवणे अशक्य असल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतलेल्या आढाव्यात उघड झाले आहे.
म्हाडास प्राप्त होणाऱ्या जमिनीवर सुमारे १६ हजार ७०० सदनिका आणि एमएमआरडीए चार योजनांमध्ये २२ हजार घरे बांधणार आहे. त्यामुळे उर्वरित १ लाखाहून अधिक गिरणी कामगारांना बृहन्मुंबईत घरे देण्याची कुठलीही योजना अजून कागदावरही तयार नाही हे वास्तव उघड झाले आहे!