शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे २८ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 20:43 IST

दूध पावडरचे दर घसरल्यास दुधाचे दर देखील १७ रुपये लिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही...

ठळक मुद्दे१ सप्टेंबरपासून होणार बदल : ग्राहकांना कोणतीही झळ बसणार नाहीदूध उत्पादक व ग्राहकांचा विचार करुन दूध खरेदीदर एकच ठेवण्याचा निर्णय

पुणे : दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी येत्या १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर २८ रुपये देण्याचा निर्णय विविध दूध उत्पादक संघांनी घेतला आहे. सर्वांचा खरेदी दर एकच असावा यावरही एकमत झाले असल्याने दूध खरेदीबाबत सुरु असलेली अनिष्ट स्पर्धा त्यामुळे संपुष्टात येणार असल्याचे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने देण्यात आली. खरेदीदरात वाढ झाली तरी, ग्राहकांना त्याची कोणतीही झळ बसणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले.सहकारी व खासगी दूध व्यवसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यवसायिक कल्याणारी संघाची सभा शनिवारी कात्रज येथे झाली. सोनाई, पराग, चितळे, प्रभात, स्वराज, एस. आर. थोरात, कृष्णाई, ऊर्जा, नेचर, तसेच बारामती, पुणे, गोकूळ, महानंद, सोलापूर या सहकारी दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. ह्यसध्या दुधाचा तुटवडा जाणवत असून, दूध पावडरला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे दूध खरेदीदर वाढविण्यासाठी उत्पादक संघांमधे स्पर्धा सुरु झाली होती. अशा वाढीचा दूध उत्पादकांना प्रत्येकी वेळी फायदा होत नाही. दूध पावडरचे दर घसरल्यास दुधाचे दर देखील १७ रुपये लिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बदलणाºया दूधदराचा परिणाम शेतकरी, दूध विक्रेता आणि डेअरी व्यावसायिक अशा सर्वांवरच होतो. दूध उत्पादक व ग्राहकांचा विचार करुन दूध खरेदीदर एकच ठेवण्याचा निर्णय संघाच्या बैठकीत घेण्यात आला. या पुर्वी खासगी आणि सहकारी दूध संघ २५ ते २७ रुपया दरम्यान खरेदीदर देत होते. आता, येत्या १ सप्टेंबरपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधासाठी २८ रुपये प्रतिलिटर दर देण्यात येईल. त्यामुळे खरेदीदरात एकवाक्यात येणार आहे. तसेच, यापुढे दूध खरेदीचे दर पत्रक देखील संघटनाच तयार करेल. दरमहिन्याला आढावा घेतला जाईल. त्या नुसार खरेदी दरात वाढ अथवा घट करण्याचा निर्णयही घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ व उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली. एमआरपी ते डिलरदर यामधे मोठी तफावत आहे. दूधउत्पादक संघांमधील स्पधेर्तून विक्रेत्याला अधिक दर देण्याची चढाओढ लागलेली असते. काही उत्पादक संघ तर लिटरमागे पाच रुपये देखील देण्यास तयार असतात. त्यामुळे दूध विक्रेत्यांना देण्यात येणारा दर कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेmilkदूधFarmerशेतकरी