वंचित चिमुकल्यांना मिळेल लाभ सुमेध वाघमारे - नागपूर ‘‘आई म्हणजे असते एक मायेचा पाझर... आईचे दूध असते अमृताचा सागर’’ परंतु हा अमृताचा सागर काही सगळ्यांच्याच वाटयाला येत नाही़ कारण, काही दुर्दैवी चिमुकल्यांची आई त्यांना जन्म देताच हे जग सोडते तर काही निष्पाप जीव अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने निर्दयी माता त्यांना उकिरड्यावर सोडून पळ काढतात़ अशा निराधार मुलांची रवानगी मग अनाथालयात होते परंतु आईच नसल्याने त्यांना वरचे दूध पाजावे लागते पण या वरच्या दुधात आवश्यक ती संरक्षक द्रव्ये नसल्याने या मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ मंदावते़ हे टाळण्यासाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ची म्हणजे ‘मानवी दुग्ध पेढी’ची मागणी अनाथालयांकडून होत असून ही प्रत्यक्षात निर्माण झाल्यास आईच्या दुधापासून परके झालेल्या अनेक वंचित चिमुकल्यांचेही आरोग्य सुदृढ करता येईल़ शासकीय रुग्णालयात अशी बँक स्थापन झाल्यास त्याचा फायदा फक्त अनाथालयांनाच नाही तर अनेक कारणांमुळे ज्या आर्इंना आपल्या बाळाला दूध पाजता येत नाही त्यांनाही होईल़
अनाथालयांना हवी मानवी ‘मिल्क बँक’
By admin | Updated: February 3, 2015 01:00 IST