नाशिकमध्ये लष्करी जवानांचा राडा
By Admin | Updated: January 14, 2015 16:54 IST2015-01-14T16:28:58+5:302015-01-14T16:54:11+5:30
नाशिकमध्ये पोलीस व लष्करी जवान यांच्यामध्ये बाचाबाची व त्यानंतर हाणामारी झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

नाशिकमध्ये लष्करी जवानांचा राडा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - नाशिकमध्ये पोलीस व लष्करी जवान यांच्यामध्ये बाचाबाची व त्यानंतर हाणामारी झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला असून आक्रमक झालेल्या जवानांनी पोलीस ठाण्यात जावून पोलीस ठाण्याची तोडफोड केली. यावेळी जवानांनी पोलिसाला मारहाण केली. या हाणामारीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगणयात येत आहे. पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीसाला सुध्दा मारहाण करण्यात आल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात डांबण्याचा प्रकारही काही लष्करी जवानांनी केला. नाशिकमध्ये एका लष्करी अधिका-याला पोलिसांनी अटक केल्यानेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.