शहापुरात पोलिसावर जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: April 10, 2015 04:23 IST2015-04-10T04:23:17+5:302015-04-10T04:23:17+5:30

एका मोटारसायकलवर तिघांना येत असल्याचे पाहून एका हवालदाराने अडवले. त्याचा राग येऊन त्याच्यावरच जीवघेणा हल्ला करण्याची घटना

Military firing on police in Shahapur | शहापुरात पोलिसावर जीवघेणा हल्ला

शहापुरात पोलिसावर जीवघेणा हल्ला

शहापूर : एका मोटारसायकलवर तिघांना येत असल्याचे पाहून एका हवालदाराने अडवले. त्याचा राग येऊन त्याच्यावरच जीवघेणा हल्ला करण्याची घटना गोठेघर येथे घडली. पोलीस हवालदार प्रशांत वाघ (३९) यांच्यावर शहापूर-किन्हवली रस्त्यावरील गोठेघर येथे आठ जणांच्या टोळक्याने गुप्ती, चॉपरने जीवघेणा हल्ला केला.
किन्हवली मार्गाने येणाऱ्या विनापरवाना वाहनांची तपासणी सुरू असतानाच एका मोटारसायकलवर तिघांना येताना पाहून हवालदार वाघ यांनी त्यांना अडविले. याचा राग येऊन त्या मुलांनी फोन करून इतर पाच जणांना बोलवले. या आठही जणांनी वाघ यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. वाघ यांच्या मदतीसाठी दोन पोलीस धावून आले, मात्र त्यांनाही न जुमानता हे हल्लेखोर पोलिसांसमोरून सहज निघून गेले.
पोलिसावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध याआधीदेखील दखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. शिवाय, राज्य गुप्तचर विभागाच्या शोधक्रमवारीतही त्यांच्या नावांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सुनील लकडे, जयेश फरडे, अनिल कांबळे, प्रीत, संदीप वाळींबे, मनोज लकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांची नावे कळू शकली नाहीत. हल्लेखोरांच्या तपासासाठी पथक रवाना झाले असून मुंबई-नाशिक महामार्ग व वाडा, मुरबाड तालुक्यांच्या सीमा तपासणी नाक्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. वाघ यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Military firing on police in Shahapur