महिला अधिकार्यासह एक जेरबंद
By Admin | Updated: May 21, 2014 03:50 IST2014-05-21T03:50:52+5:302014-05-21T03:50:52+5:30
भूखंड नावावर करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणारी एक महिला अधिकारी आणि तिच्यासाठी लाच स्वीकारणर्या दलालाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले.

महिला अधिकार्यासह एक जेरबंद
नागपूर : भूखंड नावावर करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणारी एक महिला अधिकारी आणि तिच्यासाठी लाच स्वीकारणर्या दलालाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. वर्षा सुभाष भगत आणि कमल फकिरचंद सुदानी अशी आरोपींची आहेत. वर्षानगर भूमापन अधिकारी कार्यालयात परिरक्षण भूमापक आहे. गजेंद्र देवीदयाल खुंगर (वय ६०) हे वर्धमाननगरात राहातात. अनिल अवचळ (रा. कच्ची विसा भवन, लकडगंज) यांच्या पारडी येथील भूखंडाचे नामांतर करण्यासाठी खुंगर यांनी नगर भूमापन अधिकारी क्रमांक २च्या कार्यालयात अर्ज सादर केला होता़ परिरक्षण भूमापक भगत हिच्याकडे हा अर्ज पुढील कारवाईसाठी आला होता. हे काम करून देण्यासाठी वर्षा भगत हिने खुंगर यांना २ हजारांची लाच मागितली. आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि परवानग्या असतानाही लाचेसाठी अडवून धरणार्या वर्षाला धडा शिकविण्यासाठी खुंगर यांनी एसीबीचे अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांची आज भेट घेतली.