मिक्का सिंगविरोधात विनयभंगाची तक्रार
By Admin | Updated: July 5, 2016 23:44 IST2016-07-05T23:44:00+5:302016-07-05T23:44:00+5:30
गायक मिक्का सिंगविरोधात अंधेरीच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.

मिक्का सिंगविरोधात विनयभंगाची तक्रार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - गायक मिक्का सिंगविरोधात अंधेरीच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. एका डिझायनरनं मिक्का सिंगनं घरी बोलावून छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. ज्या वेळी मिक्का सिंगच्या घरी ती डिझायरन गेली त्यावेळी त्यानं तिच्यासोबत असभ्य वर्तन केलं, असं तिनं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मिक्का सिंगविरोधात 354, 323, 504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधाही मिक्का सिंगनं अनेक प्रकरणात वाद ओढवून घेतला आहे. 2006ला मिक्का सिंगनं राखी सावंतचा किस घेतला होता. 2014मध्ये हिट अँड रन प्रकरणातही तो अडकला होता. दक्षिण दिल्लीतही त्यानं लाइव्ह कार्यक्रमात एका डॉक्टरच्या कानशिलात लगावली होती.