शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?; ठाकरे गटाच्या दाव्यावर शरद पवारांचं वेगळंच मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:50 IST

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला.

मुंबई - राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य सुप्रीम कोर्टातील निकालावर अवलंबून आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार टिकणार की जाणार हे स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सुनावणी सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याची विधानं समोर येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले आहे. 

पत्रकार परिषद शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्थिरतेबाबत पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सरकार पडेल की नाही हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. माझा त्यावर विश्वास नाही. हात दाखवायला मी कुठेही जात नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. आसाममध्ये काय घडलं? हे देशाला माहिती आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, विज्ञानाचा पुरस्कार करणं आहे. परंतु मध्यावधीचं भाष्य मी कधी केले नाही. मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे सांगण्याच्या मी स्थितीत नाही असं सांगत ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विधानावर भाष्य केले. 

राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधानं करणं हा राज्यपालांचा लौकीक आहे. समाजात वाद निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे का असा प्रश्न निर्माण होतो. या पदावर जबाबदारीने भूमिका घ्यायची असते. राज्यपाल ही घटनात्मक पद आहे त्यामुळे त्यावर जास्त बोलले नाही. परंतु छत्रपती शिवरायांबद्दल त्यांनी जे विधान केले. त्यामुळे त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत. राज्यपालांबाबत योग्य तो निर्णय राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी घेतला पाहिजे असंही पवारांनी मागणी केली. 

...तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर चर्चा करू जी काही विधान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केलाय. आम्ही बेळगाव, कारवार, निपाणी मागतोय. बेळगाव, कारवार निपाणी, भालकी ही मागणी महाराष्ट्राची आहे. काही गावे कर्नाटकला हवीत तर त्यावर चर्चा होऊ शकते. परंतु त्याआधी बेळगाव, कारवार, निपाणी सोडायला हवं.  काहीच न करता मागणी करणं त्याला आमचा विरोध आहे. भाजपाच्या पाठिंब्याचं राज्य तिथे आहे. कसंही वागा, काहीही मागण्या करा असा आत्मविश्वास वाढलाय. भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही असं सांगत शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा