शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत होऊ शकतात मध्यावधी निवडणुका, शिवसेना खासदार संजय राऊतांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 22:14 IST

सध्या देशातील वातावरण बघता दोन महिन्यांत देखील निवडणुका लागू शकतात, असे भाकीत राज्यसभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज रात्री दिंडोशीत काढले.

- मनोहर कुंभेजकरमुंबई- सध्या देशातील वातावरण बघता दोन महिन्यांत देखील निवडणुका लागू शकतात, असे भाकीत राज्यसभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज रात्री दिंडोशीत काढले. न्यू दिंडोशीच्या रॉयल हिल्स सोसायटीत खासदार संजय राऊत यांच्या फंडातून साकारलेल्या सुसज्ज क्रीडांगण आणि व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा आज रात्री त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.आपल्या भाषणात दिंडोशीचे आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी अजून आमदारकीच्या निवडणुकीला दोन वर्षे बाकी आहे. त्यामुळे येथील विकासकामांसाठी आपला खासदार निधी द्यावा अशी मागणी केली असता, हा धागा पकडून दोन वर्षे काय घेऊन बसलात. दोन महिन्यात देखील निवडणुका होतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले. आमदार प्रभू यांनी दिंडोशीचा विकास चांगल्या पद्धतीने केला असून, येथे आल्यावर सुंदर रस्ते, उंच इमारती आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत हा भाग असल्यामुळे असणारी शुद्ध हवा पाहता दिंडोशीत तर मलबार हिल, वाळकेश्वर, बीकेसीत आल्यासारखेच वाटते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राचा निकाल काहीही लागो, मात्र दिंडोशीत भगवा फडकणारच, असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.यावेळी मंचकावर महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने, स्थापत्य समिती अध्यक्ष(उपनगरे) व स्थानिक नगरसेवक तुळसीराम शिंदे, विधी समिती अध्यक्ष अॅड.सुहास वाडकर, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को-ऑप-हाऊसिंग सोसायटीचे सचिव अजित जठार आदी मान्यवर उपस्थित होते. येथील सुसज क्रीडांगण आणि व्यायामशाळा या दोन्ही वास्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को- ऑप सोसायटीकडे सोपवण्यात आली आहे. तसेच म्हाडाने यासाठी ' ना हरकत प्रमाणपत्र' दिले असून, हे क्रीडांगण १४ हजार चौरस फूट विस्तीर्ण असून व्यायामशाळेचे क्षेत्रफळ ५०० चौफूट आहे. येथील परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार असून त्यांना हक्काचे मोकळे क्रीडांगण आणि व्यायामशाळा मिळणार आहे, अशी माहिती जठार यांनी दिली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक