मायक्रो फायनान्स फसवणूक; अभ्यास गटाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 02:34 AM2020-09-19T02:34:20+5:302020-09-19T02:34:43+5:30

जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या समितीच्या अध्यक्ष असतील.

Microfinance fraud; Establishment of study group | मायक्रो फायनान्स फसवणूक; अभ्यास गटाची स्थापना

मायक्रो फायनान्स फसवणूक; अभ्यास गटाची स्थापना

Next

मुंबई : जादा व्याजदराचे आमिष दाखवून महिलांना चक्रव्यूहात अडकविणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांपासून महिलांची सुटका करण्याचा निर्धार राज्याच्या ग्रामविकास विभागाने केला. यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता शुक्रवारी अभ्यास गट स्थापन केला.
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या समितीच्या अध्यक्ष असतील. शासकीय सदस्यांत भंडारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी., रत्नागिरी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखर, अशासकीय सदस्यांमध्ये सुरेखा ठाकरे (अमरावती), विजया शिंदे (राजगुरुनगर), डॉ.स्मिता शहापूरकर (उस्मानाबाद), कांचन परुळेकर (कोल्हापूर), यांचा समावेश आहे. हा अभ्यास गट काही उपगटदेखील तयार करेल व राज्यातील महिलांच्या आर्थिक समस्या जाणून घेईल. राज्यातील अनेक महिला यात फसल्याने अखेर ग्रामविकास विभागाने हा अभ्यास गट स्थापन केला. तो तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करेल.

Web Title: Microfinance fraud; Establishment of study group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.