रायगडमध्ये म्हसळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर

By Admin | Updated: July 20, 2016 03:23 IST2016-07-20T03:23:14+5:302016-07-20T03:23:14+5:30

शैक्षणिकदृष्ट्या म्हसळा तालुका हा रायगड जिल्ह्यात निश्चितपणे अग्रेसर आहे.

Mhasla taluka educationally ahead in Raigad | रायगडमध्ये म्हसळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर

रायगडमध्ये म्हसळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर


म्हसळा : शैक्षणिकदृष्ट्या म्हसळा तालुका हा रायगड जिल्ह्यात निश्चितपणे अग्रेसर आहे. गुरु जनांच्या प्रेरणेतूनच हे शक्य झाल्याचे प्रतिपादन सभापती नाजिम हसवारे यांनी केले.
गुरुपौर्णिमा व व्यासपूजेचे औचित्य साधून म्हसळा तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी संकल्प प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्या तथा जिल्हा शिक्षण समिती सदस्या वैशाली सावंत, गटविकास अधिकारी नीलम गाडे, व्यंकटेश सावंत, डायटचे अधिव्याख्याते भोजने, अधिव्याख्याते वाघ, संदीप जामकर, संतोष घुटुगळे, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बी.एस.माळी, सर्व केंद्र प्रमुख, मान्यवर उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. जि.प.सदस्या वैशाली सावंत यांनी आई-वडिलानंतर मानाचे स्थान गुरुचे असून शाळा हे संस्कार घडविणारे उत्तम माध्यम आहे. संस्कार विकत घेता येत नसून ते घडवायचे असतात, असे मार्गदर्शन केले.
>करंजे येथे गुरु पौर्णिमा साजरी
पोलादपूर : तालुक्यात करंजे येथे भावे महाराज समाजाचे गुरु वर्य ह.भ.प. राम घाडगे महाराज यांच्या शिष्यगणांनी गुरु पौर्णिमेनिमित्त पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. गायनाचार्य विठ्ठल (बापू) घाडगे, मृदुुंगमणी विठ्ठल (अण्णा) घाडगे, सुनील मेस्त्री, सुमन केसरकर, सतीश कलंबे, विठ्ठल मांढरे, पांडुरंग उतेकर आदी मान्यवरांचे भजन झाले.
गुरु भेटीचा अनुपम सोहळा यावेळी पार पडला. कार्यक्र मासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उमेश केसरकर, सचिव केशव उतेकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष अशोक अहिरे, सचिव अनंत घाडगे, कार्याध्यक्ष तुकाराम केसरकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी गुरु पौर्णिमेनिमित्त आपले विचार मांडले.

Web Title: Mhasla taluka educationally ahead in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.