सैराटमधल्या 'अक्का'ला लागले म्हाडाचे घर
By Admin | Updated: August 10, 2016 12:43 IST2016-08-10T12:40:54+5:302016-08-10T12:43:24+5:30
उत्पन्नाचे विक्रम मोडणारा लोकप्रिय मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये 'अक्का'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदमलाही म्हाडा लॉटरीमध्ये घर लागले आहे.

सैराटमधल्या 'अक्का'ला लागले म्हाडाचे घर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - उत्पन्नाचे विक्रम मोडणारा लोकप्रिय मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये 'अक्का'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदमलाही म्हाडा लॉटरीमध्ये घर लागले आहे. सायन प्रतिक्षानगरमध्ये छाया कदमला घर मिळाले आहे.
परश्या आणि अर्ची पळून हैदराबादला आल्यानंतर त्यांना अक्का आपल्या घरात आसरा देते. सैराटमध्ये छायाची छोटीशी भूमिका होती. पण त्या भूमिकेतही तिने आपला ठसा उमटवला. फॅन्ड्री चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.
भिडू या चित्रपटासाठी छायाला दादासाहेब फाळके उत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यावेळच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या अभिनेत्रींना घर लागले आहे.