शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा नोकरभरतीसाठी होणार दोनदा परीक्षा; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 06:11 IST

गैरप्रकाराला आळा बसणार : जितेंद्र आव्हाड

म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत तक्रारी आल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने आता पुन्हा एकदा मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे दिली.यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता झालेल्या परीक्षेत घोटाळे झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षांमध्येदेखील पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्या कानावर आल्या होत्या, परंतु येथे कष्ट आणि ज्ञानाला किंमत आहे, हे विसरून चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे असा प्रकार घडत असेल तर अशांना दम दिला आहे. त्यातूनही यातील एक गोष्ट जरी माहिती पडली तर त्याला माफी नाही, पैसे देऊन पास होतील असे वाटत असेल तर चाळणी लावण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी आता जानेवारी महिन्यात दुसरी म्हणजेच मुख्य परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे म्हाडामधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला आळा घातला जाईल, असा विश्वासही त्यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केला. या परीक्षेसाठी काही दलालांनी सेटिंग करून देतो म्हणून परीक्षार्थी उमेदवारांकडे पैसे उकळले आहेत. मात्र तुमचे कोणतेही काम मी होऊ देणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी या दलालांना या वेळी दिला.

माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी दलालांना विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही.जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmhadaम्हाडा