शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची स्वत:च्याच जमिनींसाठी मुंबईसह राज्यभरात शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:44 IST

मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांसाठी सर्व जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडा प्राधिकरणाकडे मोकळ्या जमिनीच नसल्याने नवीन घरांची निर्मिती अवघड झाली आहे.

- अजय परचुरेमुंबई : मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांसाठी सर्व जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडा प्राधिकरणाकडे मोकळ्या जमिनीच नसल्याने नवीन घरांची निर्मिती अवघड झाली आहे. यावर तोडगा म्हणून आता म्हाडा मुंबईसह राज्यभर स्वत:च्याच मालकीच्या जमिनींचा शोध घेणार आहे. आउट सोर्सिंगद्वारे मुंबईसह राज्यभरात म्हाडाच्या किती जमिनी आहेत, कुठे आणि किती अतिक्रमणे झाली आहेत, याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ‘लोकमत’ला दिली.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचा आराखडा तयार करण्याआधी या मार्गावर आपल्या मालकीचीकिती जमीन आहे, याचीमाहिती निविदा काढून आउट सोर्सिंगद्वारे मिळविली. त्याच धर्तीवर म्हाडा महाराष्टÑभर जमीन शोधमोहीम राबवेल. नवीन वर्षात या कामासाठी निविदा काढण्यात येतील. त्यानंतर कंपनी नियुक्त करून ठरावीक वेळेतच ही शोधमोहीम पूर्ण करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.याआधी म्हाडाकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या. ज्या मोकळ्या होत्या तिथे त्यांनी गृहप्रकल्प उभारले. पण ज्या जमिनींकडेम्हाडाचे दुर्लक्ष झाले तेथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली.ती हटविणे म्हाडाला अद्यापशक्य झालेले नाही.मुंबईचाविचार केल्यास गृहप्रकल्प उभारण्यासाठी म्हाडाकडे मुंबईत जमिनीच नाही. एखादी खासगी जमीन विकत घ्यायची तर भरमसाट किंमत मोजावी लागेल; शिवाय अशा महागड्या जमिनींवर उभे राहणारे गृहप्रकल्पही महागडेच असतील. अशी महागडी घरे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरची असतील. त्यामुळे मुंबईत म्हाडाला सध्या तरी पुनर्विकासावरच अवलंबून राहावे लागत आहे. म्हाडाची राज्यातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. तेथेही मोकळ्या जमिनींची वानवाच आहे....म्हणूनच आली माहिती गोळा करण्याची वेळम्हाडाकडे सध्या किती जमीन आहे, त्यातल्या किती जमिनींवर बांधकाम झाले आहे, किती जमीन शिल्ल्क आहे, किती व कुठल्या जमिनींवर अतिक्रमणे झाली आहेत, याची सविस्तर माहिती म्हाडाकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच आता ही माहिती गोळा करण्याची वेळ म्हाडावर आली आहे.यावर उपाय म्हणून सामंत यांनी तत्काळ म्हाडा प्राधिकरणाची बैठक बोलावत मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या जमिनींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :mhadaम्हाडाMaharashtraमहाराष्ट्र