शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' लॉटरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट! विजेत्याला घर बदलून दिले, आधीच्या विजेत्यासोबतचा करारही रद्द केला, तरी...; म्हाडाचा मोठा खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 11:52 IST

MHADA Pune Lottery 2026 Viral Video: म्हाडा पुणे मंडळाचा पिंपरी वाघेरे योजनेत मोठा गोंधळ. सदनिका बी/९०३ चे दुहेरी वाटप झाले. म्हाडाने चूक सुधारली तरी विजेतीने ताबा नाकारला, अखेर बँकेने घर जप्त करून लिलावात काढले. वाचा सविस्तर.

पुणे/पिंपरी: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पिंपरी वाघेरे योजनेत प्रशासकीय चुकीमुळे एकाच सदनिकेचे दुहेरी वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रिक्त नसतानाही सदनिका क्र. बी/९०३ ही चुकून रिक्त यादीत समाविष्ट झाल्याने हा पेच निर्माण झाला. यावरून पिडीत कुटुंबाने नुकत्याच झालेल्या पुणे सोडतीवेळी आपली व्यथा मांडली होती. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता. यावर म्हाडाचा आता खुलासा आला आहे.  

रेश्मा नितीन घोरपडे यांना २०१९ च्या सोडतीत आधी ए/१७०३ ही सदनिका मिळाली होती. यासाठी त्यांना सदनिकेची किंमत रु. ५५,६२,५००/- चा भरणा करण्यासाठी मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र देण्यात आले होते. घोरपडे यांनी ऑक्टोबर, २०२० मध्ये ही सदनिका व मजला बदलून मिळाला म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना बदलून ९०३ ही सदनिका देण्यात आली. म्हाडाकडून सर्व व्यवहार झाल्यानंतर घोरपडे हे त्या सदनिकेचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यामध्ये दिनेश चौधरी हे राहत होते. म्हाडाने नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतून ही सदनिका चौधरी यांनाही वितरित केली होती. त्यांचा व्यवहारही पूर्ण झाला होता व ताबापत्र मिळताच ते तिथे रहायला गेले होते.   

म्हाडाकडून चूक दुरुस्त, पण विजेती अडून बसलीघोरपडे यांनी तक्रार केल्यानंतर म्हाडाच्या दुहेरी वाटप झाल्याचे लक्षात आले. यानंतर म्हाडा प्रशासनाने सुनावणी घेतली. यावेळी घोरपडे यांना रिक्त सदनिकांपैकी एक निवड करण्याचा पर्याय सुचविण्यात आला. परंतू, ते जी मिळालीय तीच द्यावी अशी मागणी करत अडून बसले. यामुळे पुढे झालेल्या सुनावणीवेळी चौधरी यांनी सामंजस्याची भूमिका घेत सदनिका बदलून घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यांना दुसरी सदनिका (बी/११०३) देण्यात आली. यासाठी चौधरींसोबतचे आधीचे दस्त रद्द करण्यात आले. अशा प्रकारे बी/९०३ ही सदनिका पुन्हा श्रीमती घोरपडे यांच्यासाठी रिक्त झाली. प्रशासनाने त्यांना वारंवार ताबा घेण्याबाबत ई-मेल आणि पत्रे पाठवली, परंतु त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत ताबा घेण्यास नकार दिला.

बँकेची जप्ती आणि लिलावदरम्यान, श्रीमती घोरपडे यांनी या घरासाठी कॅनरा बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाचे हप्ते भरले नाहीत. परिणामी, बँकेने SARFAESI ACT २००२ अंतर्गत सदनिकेचा ताबा घेतला. बँकेने या घराचा लिलाव केला असून, आता ही सदनिका श्रीमती पूनम अग्रवाल यांना वितरित करण्यात आली आहे. म्हाडाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी श्रीमती अग्रवाल यांच्या नावे नियमितीकरण पत्रही दिले आहे.

म्हाडाची भूमिकादुहेरी वितरणाची चूक वेळेत दुरुस्त करून घोरपडे यांना त्यांचे घर परत देण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, त्यांच्या असहकार्यामुळे आणि कर्ज थकबाकीमुळे बँकेने कायदेशीर लिलावाची जाहिरात काढून कारवाई केली. यामध्ये आता मंडळाची कोणतीही चूक किंवा कायदेशीर जबाबदारी उरलेली नाही, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. 

घोरपडेंचे आरोप काय होते... इथे क्लिक करा...

 

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Lottery Twist: House Allotted, Then Retracted, Now Bank Auctioned!

Web Summary : MHADA's Pimpri Waghere housing scheme faced a double allotment issue. Despite attempts to rectify the error and offer alternative housing, the original winner refused, leading to bank repossession and auction due to unpaid loans. MHADA denies responsibility.
टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरी