शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

साडेचार हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ८ मार्चला शुभारंभ, १३ ते २५ लाख रुपये किमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 07:13 IST

पाहा कुठे आहेत ही घरं, कसा करता येईल अर्ज

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून साडेचार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ ८ मार्चपासून होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, सर्वसमावेशक योजना आणि कोकण मंडळ योजनेचा यंदाच्या लॉटरीत समावेश आहे. मे महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार असून, घरांच्या किमती १३ लाखांपासून सुरू होत असून, घरांच्या क्षेत्रफळानुसार घरांच्या किमतीमध्ये बदल होत आहेत. १३ लाखांपासून सुरू झालेल्या किमती २५ लाखांपर्यंत असणार आहेत.

१० एप्रिलपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. १२ एप्रिलपर्यंत अनामत रक्कम भरता येईल. २८ एप्रिलपर्यंत हरकती मांडता येतील. तर १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घरांची लॉटरी काढली जाईल. दरम्यान,  विखुरलेल्या घरांची लॉटरी काढली जाणार असून, त्याचे वेळापत्रक म्हाडाने स्वतंत्र काढले आहे. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत १४५६ घरांचा समावेश आहे. ही घरे ठाणे, पालघर, कल्याण, वसई, नवी मुंबई, सानपाडा आणि विरार येथे आहेत. म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेत घरे आणि भूखंडाचा समावेश आहे. रायगड, कल्याण, पेण, अंबरनाथ, बदलापूर, सिंधुदुर्गमध्ये घरे, भूखंड असून, त्याचा आकडा १६६ आहे. कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २०४८ विखुरलेली घरे विरार येथे आहेत. 

प्रधानमंत्री आवास योजनेत एकूण घरेकल्याण येथील  शिरढोण आणि खोणी, ठाणे येथील गोठेघर, विरार येथील बोळींज येथे ही घरे आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना (कौटुंबिक उत्पन्न)अत्यल्प उत्पन्न गट - ३ लाखांपर्यंतउत्पन्न गट - उत्पन्न मर्यादा (मुंबई, पुणे, नागपूर, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था) / उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था) / चटई क्षेत्रअत्यल्प गट - ६ लाख / ४ लाख ५० हजार / ३० चौमीटरअल्प गट - ९ लाख / ७ लाख ५० हजार / ६० चौमीटरमध्यम गट - १२ लाख / १२ लाख / १६० चौमीटरउच्च गट - कमाल मर्यादा नाही / कमाल मर्यादा नाही / २०० चौमीटर

माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना ८ मार्चपासून दुपारी १२ पासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

टॅग्स :mhadaम्हाडा