लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : म्हाडाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विकली जाणार आहेत. घरांच्या किमतीबाबत म्हाडाने स्पष्टता केली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची कमीत कमी किंमत ३१ लाख असणार आहे. तर जास्तीत जास्त किंमत ८ कोटी असेल. ८ कोटींची घरे ताडदेव येथील असतील. दरम्यान, यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचा यात समावेश आहे.
घरासाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज नोंदणी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना / घर निश्चिती करणे या प्रक्रियेला १२ फेब्रुवारीच्या सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. घराच्या विक्री किमतीचा १० टक्के रकमेचा भरणा घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत करणे आवश्यक आहे.
९० दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे अनिवार्य
तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर ९० दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम ९० दिवसांची मुदतवाढ घेऊन व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे. कसूर केल्यास वितरण कारण न देता, मुदत संपताच रद्द करण्यात येईल.
दिलेल्या माहितीनुसार म्हाडाच्या घरांच्या उपलब्धतेचा तक्ता खालीलप्रमाणे आहे:
म्हाडा वसाहतींमधील उपलब्ध घरांचा तपशील
| वसाहतीचे नाव / ठिकाण | उपलब्ध घरांची संख्या |
| तुंगा, पवई | ४४ |
| अँटॉप हिल, वडाळा | २७ |
| शिंपोली, कांदिवली | ०८ |
| चारकोप सेक्टर, कांदिवली | ०८ |
| कांदिवली | ०२ |
| पीएमजीपी, मानखुर्द | ०१ |
| मालवणी, मालाड | ०१ |
| गायकवाड नगर, मालवणी (मालाड) | ०१ |
| एकूण | ८४ |
विकास नियमावली ३३(५) आणि ३३(७) अंतर्गत उपलब्ध घरे
| वसाहतीचे नाव / ठिकाण | उपलब्ध घरांची संख्या |
| अँटॉप हिल, वडाळा | ०८ |
| जेव्हीपीडी, अंधेरी पश्चिम | ०७ |
| भायखळा | ०६ |
| ताडदेव | ०६ |
| लोअर परळ | ०४ |
| घाटकोपर पूर्व | ०२ |
| सायन | ०२ |
| कन्नमवार नगर, विक्रोळी | ०१ |
| एकूण | ३६ |
Web Summary : MHADA offers 120 homes in Mumbai on a first-come, first-served basis. Prices range from ₹31 lakh to ₹8 crore. Online registration starts February 5th, with application process beginning February 12th. 10% deposit due within 48 hours of selection; balance within 90 days.
Web Summary : MHADA मुंबई में 'पहले आओ, पहले पाओ' के आधार पर 120 घर दे रहा है। कीमतें ₹31 लाख से ₹8 करोड़ तक हैं। ऑनलाइन पंजीकरण 5 फरवरी से शुरू, आवेदन प्रक्रिया 12 फरवरी से। चयन के 48 घंटों के भीतर 10% जमा; शेष 90 दिनों में।