शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

MHADA: पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना खूशखबर, म्हाडातर्फे ५९९० सदनिकांसाठी सोडत जाहीर, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:47 IST

MHADA Home's:  म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते आज करण्यात आला.

मुंबई -  म्हाडाच्यापुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते आज करण्यात आला. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय ऍपचा वापर करणारे पुणे मंडळ हे म्हाडाचे सर्वात पहिले मंडळ आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार असून पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे.       

IHLMS 2.0 या नूतन संगणकीय ऍपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी १२.०० वाजेपासून सुरवात झाली. आज सायंकाळपर्यंत सुमारे ४४०० अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेस सुरवात केली आहे. 

नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या ऍपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम च्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध  करून देण्यात आली आहे. तसेच येथे ऍप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. माने यांनी केले आहे.      

IHLMS 2.0 या संगणकीय ऍप अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी पुणे मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ०५ फेब्रुवारी, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या ऍप वरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.  दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३  रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या ऍप द्वारे पात्र ठरविले जातील व सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १५ फेब्रवारी, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.  

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन ऍपमध्ये प्राप्त होणार आहे .  

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांपैकी २९०८ सदनिका या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील असल्याने संगणकीय सोडतीत त्यांचा समावेश असणार नाही.  तसेच  म्हाड कायद्यातील तरतुदींनुसार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची तिसरी सोडत असून पात्रतेचे निकष यांकरिता लागणार नाहीत. अर्जदाराने अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांना तात्पुरते देकार पत्र  दिले जाईल. सदनिकेची किंमत पूर्ण भरल्यानंतर ताबा प्रक्रिया लगेच सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची माहिती म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ https://lottery.mhada.gov.in वर मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

माने यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस पुणे मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.

टॅग्स :mhadaम्हाडाHomeसुंदर गृहनियोजनPuneपुणे