म्हाडा परीक्षेचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध
By Admin | Updated: October 7, 2015 03:51 IST2015-10-07T03:51:54+5:302015-10-07T03:51:54+5:30
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होणार असून

म्हाडा परीक्षेचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, उमेदवारांना ७ आॅक्टोबरला सकाळी १0 वाजेपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, उपअभियंता (स्थापत्य व विद्युत), सहायक विधी सल्लागार, विधी सहायक, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत) या पदांची परीक्षा २0 आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, तर लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांसाठी २५ आॅक्टोबर रोजी परीक्षा होईल. त्याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, वायरमन या पदांसाठी १ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे, म्हाडाने जाहीर केले आहे. २४0 जागांसाठी म्हाडाकडे तब्बल ४६ हजार अर्ज आले असून, उमेदवारांना म्हाडाच्या ६६६.ेँंंि.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरून उपलब्ध होणार असल्याचे, म्हाडाने कळविले आहे.