मेट्रो येणार रुळावर
By Admin | Updated: August 3, 2014 00:24 IST2014-08-03T00:24:37+5:302014-08-03T00:24:37+5:30
पुणो मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

मेट्रो येणार रुळावर
पुणो : पुणो मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर मेट्रोचे भूमिपूजन करावे. तसेच, ती सुरू होणार असल्याचा विश्वास नागरिकांना द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिकेच्या पदाधिका:यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने कात्रज येथील प्राणिसंग्रहालयासमोर भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, महापौर चंचला कोद्रे, आमदार रमेश बागवे, शरद रणपिसे, विनायन निम्हण, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महापालिका आयुक्त विकास देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, पुतळा समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी हे या वेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘देशात स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रेरणोतून 1991मध्ये नवे आर्थिक पर्व सुरू झाले. त्यांच्या या धोरणांचा आदर्श घेऊन आघाडी सरकारने गेल्या दहा वर्षात लोकाभिमुख उप्क्रमांवर भर दिला. तसेच, या कालावधीत राज्यातील शहरांच्या विकासाची परिणामकारक कामे पूर्ण केली आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई येथे मोनो आणि मेट्रो रेल्वे सुरू करणो, मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग, मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध लिंक रस्ते अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या धर्तीवर
पुणो शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने पुणो मेट्रोला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होणार आहे. याची ग्वाही नागरिकांना देण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर भूमिपूजन करावे आणि तो सुरू होईल, याचा विश्वास नागरिकांना द्यावा.’’
पुण्याबरोबरच नागपूर रेल्वेला मान्यता देण्यात आली असून, नवी मुंबईतील मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच ठाणो मेट्रो प्रकल्पालाही मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चव्हाण यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
राजीव गांधींचा पुतळा युवकांसाठी प्रेरणादायी
महापालिकेकडून बसविण्यात आलेला हा पुतळा पद्मश्री राम सुतार यांनी साकारलेला आहे. हा युवकांसाठी प्रेरणास्रोत आणि स्फूर्ती देणारा ठरेल, असा विश्वास चव्हाण यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. राजीवजींनी देशाची एकात्मता जोपासण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच, देशाला 21व्या शतकात जाण्याची दृष्टी दिली. त्यामुळे हा पुतळा प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.