काकस्पर्श झाल्याने मेट्रो ठप्प
By Admin | Updated: June 14, 2014 20:47 IST2014-06-14T20:47:56+5:302014-06-14T20:47:56+5:30
काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोने मुंबईच्या इतर वाहतूक सुविधांची री ओढली आहे. कावळा वायरवर बसल्याने तांत्रिकबिघाड झाला असून मेट्रो सेवा ठप्प झाली आहे.

काकस्पर्श झाल्याने मेट्रो ठप्प
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १४ - काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोने मुंबईच्या इतर वाहतूक सुविधांची री ओढली आहे. कावळा वायरवर बसल्याने तांत्रिकबिघाड झाला असून मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. ऐन पावसाळ्यात मेट्रोच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. घाटकोपर ते वर्सोवा आणि वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान सुमारे दिडतास मेट्रो सेवा ठप्प झाल्याने मेट्रोवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची निराशा झाली आहे. रविवार दिनांक ८ जून रोजी सुरू झालेली मेट्रो आठवडापूर्ण होण्याआधीच बंद झाली आहे. या संदर्भात विचारले असता मेट्रोच्या अधिका-यांनी बोलण्यास नकार दिला आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक लोक मेट्रोने प्रवास करण्यासाठी उत्सूकतेने तिकीट खिडक्यांवर गर्दी केली असून मेट्रो ठप्प झाल्याने प्रवासासाठी उत्सूक असणा-या नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे