मेट्रोची सुनावणी १२ आॅगस्टला
By Admin | Updated: August 2, 2016 01:06 IST2016-08-02T01:06:59+5:302016-08-02T01:06:59+5:30
शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी या मार्गाचा पावणेदोन किलोमीटर भाग हा नदीपात्रातून जात आहे.

मेट्रोची सुनावणी १२ आॅगस्टला
पुणे : शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी या मार्गाचा पावणेदोन किलोमीटर भाग हा नदीपात्रातून जात आहे. त्यामुळे या मार्गाला स्थगिती देण्याच्या केलेल्या मागणीवर हरित लवादामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १२ आॅगस्ट रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.
शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचा समावेश आहे. त्यातील वनाज ते रामवाडी या मार्गामध्ये बदल करून तो नदीपात्रातून वळविण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कोणतेही बांधकाम करता येत नसल्याने त्याला स्थगिती देण्याची याचिका हरित लवादासमोर दाखल करण्यात आली आहे. यावर महापालिका, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन (डीएमआरसी), राज्य सरकार, जलसंपदा विभागांना एक आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार ही प्रतिज्ञापत्रे सादर केली आहे.