संदेश पारकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

By Admin | Updated: January 6, 2016 01:55 IST2016-01-06T01:55:49+5:302016-01-06T01:55:49+5:30

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांची पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात

Message Parker's expulsion from the Congress | संदेश पारकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

संदेश पारकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

कणकवली : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांची पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी मंगळवारी दिली.
पत्राची प्रत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आ. नीतेश राणे, माजी खा. नीलेश राणे यांनाही पाठविण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. पारकर यांना ३ डिसेंबर २0१५ ला पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सात दिवसांच्या आत त्यांनी नोटिसीचा खुलासा केला नाही.
८ आॅक्टोबर २0१५ला कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पक्षाने घोषित केलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. पाच नगरसेवकांना बंडखोरी करण्यास आपण प्रवृत्त केले आहे. तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर झालेल्या आनंदोत्सवात पाच बंडखोर नगरसेवक तसेच विरोधकांसमवेत आपण सहभागी झाला होतात.पक्षाने निमंत्रण देऊनही विविध कार्यक्रमांत आपण सहभागी होण्याचे टाळले आहे, असे नोटीशीत म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Message Parker's expulsion from the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.