'लोकमत जलमित्र अभियाना'चा संदेश थेट न्यूयॉर्कपर्यंत
By Admin | Updated: May 31, 2016 19:39 IST2016-05-31T18:39:17+5:302016-05-31T19:39:35+5:30
'लोकमत'नं पाणीबचतीसाठी राबवलेल्या अभियानाचा संदेश न्यूयॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इथं दिला.
'लोकमत जलमित्र अभियाना'चा संदेश थेट न्यूयॉर्कपर्यंत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - महाराष्ट्रासह दुष्काळाच्या छायेत होरपळणा-या मराठवाडा आणि विदर्भाला पाण्याची चणचण भासत असतानाच पाणी बचतीसाठी 'लोकमत'ने सुरू केलेल्या 'लोकमत जलमित्र' अभियानाला सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र यशस्वीपणे सुरू असलेल्या 'लोकमत जलमित्र' अभियानाला अनेक हॉटेल व्यावसायिक, अभिनेते आणि अनेक दिग्गजांनी सकारात्मक सहभाग दिला आहे. आता हाच 'लोकमत जलमित्र'चा संदेश थेट विदेशात पोहोचला आहे.
'लोकमत'ने पाणीबचतीसाठी राबवलेल्या अभियानाचा संदेश न्यूयॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इथं दिला. न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळ आणि छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्कच्या वतीने ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअर येथे 'लोकमत जलमित्र'चा संदेश देण्यात आला आहे. 'लोकमत'च्या या अभियानाची आता महाराष्ट्रासह देशाबाहेरही दखल घेण्यात येत आहे.