रांगोळीतून ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

By Admin | Updated: November 1, 2016 18:41 IST2016-11-01T18:41:52+5:302016-11-01T18:41:52+5:30

घटत चाललेल्या महिलांच्या संख्येचा विचार करून त्यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने शासनाकडून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला अप्रत्यक्ष

Message of 'Beti Bachao, Beti Padhao' from rangoli | रांगोळीतून ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

रांगोळीतून ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

ऑनलाइन लोकमत/ शिखरचंद बागरेचा

वाशिम, दि. 01 - घटत चाललेल्या महिलांच्या संख्येचा विचार करून त्यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने शासनाकडून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला अप्रत्यक्ष हातभार लावण्यासाठी  दिपावलीच्या शूभपर्वावर पल्लवी राजेश मालिया व प्रविण रमण मालिया या दोघी बहिणींनी सुध्दा रांगोळीच्या माध्यमाने बेटी बचाओ, बेटी पढाओ चा संदेश दिला आहे.

 
 दिवसेंदिवस मुलींचे कमी होत चाललेले प्रमाण फार मोठी चिंतेची बाब ठरत असून यासाठी शासकीय व प्रशासकीय स्तरासह समाजातील प्रत्येकाने जनजागृतीचे व्रत स्विकारले आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण दिवसागणिक कमी होत चालले आहे. या पृष्ठभूमीवर आई, बहिण, मैत्रीण हवी असणाºयांनी स्त्रीभ्रृण हत्या करु नये तसेच जन्माला आलेल्या मुलींना वाचविण्यासाठी व शिक्षित करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला हातभार लावण्यासाठीच  वाशिम येथील मालिया भगिनींनी रांगोळीतून बेटी बचाओचा संदेश दिला आहे. 

Web Title: Message of 'Beti Bachao, Beti Padhao' from rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.