पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

By Admin | Updated: September 3, 2014 00:56 IST2014-09-03T00:56:01+5:302014-09-03T00:56:01+5:30

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. शहरातील विसजर्न घाटांवर सर्वत्र गणोशाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.

Message to the 5-day counters | पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

पुणो : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. शहरातील विसजर्न घाटांवर सर्वत्र गणोशाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
 विधिवत पूजा करून गणरायाला निरोप देण्यासाठी अनेक भागांत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य हजर होता. पावसाने विश्रंती घेतल्याने उत्साह आणखी द्विगुणित झाला. शहरातील विसजर्न घाट तसेच कृत्रिम हौदांमध्ये श्रींच्या मूर्तीचे विसजर्न करण्यासाठी गर्दी झाली होती. श्रींच्या आरतीने येथील वातावरण मंगलमय झाले होते. गणरायाला निरोप देताना गणोशभक्त काही क्षण भावुक होत होते. महापालिका, अग्निशामक दल, पोलिसांच्या वतीने सर्व घाटांवर संपूर्ण तयारी करण्यात आली होती. काही सामाजिक संस्थांकडून पर्यावरणरक्षणासाठी गणोशभक्तांना आवाहन करून निर्माल्य कलशात टाकण्यात आवाहन केले जात होते. त्याला गणोशभक्तांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Message to the 5-day counters