शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

NCP Merger: "एकत्र येण्याचा निर्णय झालाच होता, फक्त घोषणा बाकी"; राजेश टोपेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:02 IST

NCP SP(NCP) Merger: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबाबत आमदार राजेश टोपेंचा सर्वात मोठा खुलासा

Rajesh Tope On NCP Merger: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात असतानाच, आता राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राजेश टोपे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. अजितदादा जिवंत असतानाच दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले होते, असे टोपे यांनी म्हटले आहे.

"विलीनीकरणाचा निर्णय झालाच होता..."

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे म्हणाले की, "अजितदादांच्या उपस्थितीतच विलीनीकरणाचा निर्णय जवळपास झाला होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. अगदी शेवटच्या बैठकाही पार पडल्या होत्या. फक्त अधिकृत घोषणा बाकी होती, जी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर केली जाणार होती." टोपे यांच्या या विधानामुळे, पडद्यामागे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एकत्र येण्याबाबत शिक्कामोर्तब झालं होतं अशी चर्चा सुरु झाली आहे.

बारामतीत नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर अजित पवार यांचे विमान उतरत असताना भीषण अपघात झाला. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे  वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा अधिकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुढील नेतृत्व कोणाकडे? सुनेत्रा पवारांकडे सूत्रे देण्याची मागणी

अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या गटाचे भवितव्य काय? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीने कुटुंबाला सावरले, त्यावरून दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अधिक वाढली आहे. जर विलीनीकरण झाले, तर सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात पक्षाचे नेतृत्व करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Merger Imminent Before Ajit Pawar's Death: Rajesh Tope Reveals Secrets

Web Summary : Rajesh Tope revealed that NCP factions were set to merge before Ajit Pawar's death. The decision was finalized, awaiting announcement post-election. Following Pawar's tragic passing, talks of unification have resurfaced, potentially positioning Supriya Sule nationally and Sunetra Pawar in Maharashtra leadership.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRajesh Topeराजेश टोपे