दया नायक निलंबित

By Admin | Updated: July 3, 2015 03:32 IST2015-07-03T03:32:27+5:302015-07-03T03:32:27+5:30

नागपूर येथे बदली झाल्यापासून गैरहजर राहिल्याने चकमकफेम, वादग्रस्त फौजदार दया नायक यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ

Mercy hero suspended | दया नायक निलंबित

दया नायक निलंबित

मुंबई : नागपूर येथे बदली झाल्यापासून गैरहजर राहिल्याने चकमकफेम, वादग्रस्त फौजदार दया नायक यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी काढले. निलंबन काळात नायक यांना दररोज नागपूर पोलीस आयुक्तांकडे हजेरी लावावी लागणार आहे.
गेल्या वर्षअखेरीस नायक यांची मुंबईहून नागपूर परिक्षेत्र अशी बदली करण्यात आली होती. मुंबईत ते पश्चिम प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. त्यांना यावर्षी जानेवारी महिन्यात कार्यमुक्तही करण्यात आले होते. मात्र असे असूनही नायक नागपूर येथे हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले, असा ठपका ठेवण्यात आला. दरम्यान, नायक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला निलंबनाचे आदेश मिळालेले नाहीत. माझी बदली नागपूरला झाली होती. माझ्या अपरोक्ष माझ्या कुटुंबाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Mercy hero suspended