पारा @६.७

By Admin | Updated: December 28, 2014 00:46 IST2014-12-28T00:46:40+5:302014-12-28T00:46:40+5:30

सरत्या वर्षाला निरोप देताना उपराजधानी गारठली आहे. नागपुरात शीतलहर सुरू झाली आहे. शनिवारी नागपूरचा पारा सामान्यापेक्षा ६ अंशाने घसरत ६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचला.

Mercury @ 6.7 | पारा @६.७

पारा @६.७

उपराजधानीत शीतलहर
नागपूर : सरत्या वर्षाला निरोप देताना उपराजधानी गारठली आहे. नागपुरात शीतलहर सुरू झाली आहे. शनिवारी नागपूरचा पारा सामान्यापेक्षा ६ अंशाने घसरत ६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड राहिले. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात पारा तब्बल ४ अंशानी घसरला. पुढील २४ तासात पारा ७ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शीतलहर आहे. दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, सायक्लोनिक सर्क्युलेशन त्याच्याशी जोडल्या गेले आहे. यासोबतच उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड हवेमुळे तापमानात अचानक घट आली आहे. विदर्भात अकोला (८.६) वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १०.१० अंशांवर आहे. वाशीम येथे सर्वाधिक १५ अंश से. तापमान नोंदविल्या गेले. नागपुरात आकाश नीरभ्र आहे. कमाल तापमान सामान्यापेक्षा २ अंशांनी कमी म्हणजे २५.७ अंश से. नोंदविण्यात आले आहे. आज दिवसभर थंड हवा सुरू होती. (प्रतिनिधी)
दुसरा सर्वाधिक थंड दिवस
यावर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडत आहे. १९ डिसेंबर रोजी किमान तापमान ६.६ अंशांपर्यंत आले होते. तो या मोसमातील सर्वात थंड दिवस होता. शनिवारी किमान तापमान ६.७ अंश से. नोंदविल्या गेले. हा मोसमातील दुसरा सर्वाधिक थंड दिवस राहिला. नव्या वर्षात तापमानात आणखी घट येण्याची शक्यता आहे.

Web Title: Mercury @ 6.7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.