किराणा दुकानावर धाडसी दरोडा

By Admin | Updated: June 17, 2016 10:27 IST2016-06-17T08:57:51+5:302016-06-17T10:27:49+5:30

आंबेगाव पठार येथील एका किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी धाडसी दरोडा टाकत 7 तोळ्यांची सोनसाखळी आणि 30 हजारांची रोकड लंपास केली

Mercenary robbery at the grocery store | किराणा दुकानावर धाडसी दरोडा

किराणा दुकानावर धाडसी दरोडा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १७ -  आंबेगाव पठार येथील एका किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी धाडसी दरोडा टाकत 7 तोळ्यांची सोनसाखळी आणि 30 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दुकानमालक आणि त्याचा कामगार जखमी झाला आहे.
आंबेगाव पठारावर किराणा दुकान आहे. दुकान मालक आणि त्याचा मुलगा दुकानात सामान लावत होते. यावेळी दोन दुचाकीवरून पाच जणांचे टोळके तेथे आले. दोघे जण बाहेर उभे राहून लक्ष ठेवत होते.  तर अन्य तीन जण दुकानात घुसले. आत गेलेल्याचोरटय़ांनी दुकांमालकाकडे पैशांची मागणी केली. त्याला विरोध करताच चोरटयांनी कोयत्यासारख्या धारदार हत्यारांनी त्यांच्या डोक्यात वार करून 7 तोळे चैन आणि 30000 रोख रक्कम लुटली. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या कामगारावरही त्यांनी हल्ला केला. दोन दुचाकींवरून आरोपी पसार झाले. दोघांना रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Web Title: Mercenary robbery at the grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.