व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

By Admin | Updated: July 19, 2016 04:33 IST2016-07-19T04:33:48+5:302016-07-19T04:33:48+5:30

येथील बेपत्ता व्यापाऱ्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बबलु उर्फ निशिकांत प्रभुनारायण पांडे (४०) हे शनिवारपासून बेपत्ता होते़

Mercenaries shot and killed | व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या


शिर्डी : येथील बेपत्ता व्यापाऱ्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बबलु उर्फ निशिकांत प्रभुनारायण पांडे (४०) हे शनिवारपासून बेपत्ता होते़
रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊरजवळ साफियाबाद वाडी शिवारातील बंद ढाब्यावर त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी बबलु यांच्या दोन मित्रांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे़ बबलु हे शनिवारी वसुलीसाठी शनिशिंगणापूर येथे गेले होते़ सायंकाळी ते शिर्डीतील दोन मित्रांबरोबर परतत असताना कोल्हार येथे उतरले व तेथून बेपत्ता झाले़ या मित्रांच्या माहितीवरुन बबलु यांचे भाऊ अजय पांडे यांनी रविवारी लोणी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती़ बबलु यांची पैशांसाठी अपहरण करून हत्या झाली का, याचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Mercenaries shot and killed