मीरा-भाईंदरची नालेसफाई दहा जूनपूर्वी होणार
By Admin | Updated: May 10, 2014 20:50 IST2014-05-10T20:43:15+5:302014-05-10T20:50:25+5:30
मीरा-भाईंदरची नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रु पये खर्चाला मंजुरी दिली असून ती १० जूनपूर्वी पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

मीरा-भाईंदरची नालेसफाई दहा जूनपूर्वी होणार
मिरारोड : मीरा-भाईंदरची नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रु पये खर्चाला मंजुरी दिली असून ती १० जूनपूर्वी पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.
महापालिका क्षेत्रात लहान-मोठे १३५ नाले असून ते २३० की.मी. क्षेत्रात पसरले आहेत, त्यातील २०० कि.मी हे पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तर ३० कि.मी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, नालेसफाईसाठी शहराचे चार विभाग करण्यात आले असून त्यात सफाईचे ४४ स्पॉट आहेत त्यातील १४ स्पॉट संवेदनशील आहेत. १० जूनपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या अटीवर एम. इ. प्रोजेक्ट प्रा.ली. व आशापुरा कंपनी या दोन ठेकेदारांना नियुक्त करून त्यावर दीड कोटी रु पये खर्चाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. महापालिका उपायुक्त डॉ.संभाजी पानपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेचे प्रभाग अधिकारी ठेकेदाराच्या कामावर लक्ष ठेवून असणार असल्याची माहिती दिली.