जेजुरीत मर्दानी दस:याला प्रारंभ
By Admin | Updated: October 4, 2014 01:41 IST2014-10-04T01:41:22+5:302014-10-04T01:41:22+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरी येथील जगप्रसिद्ध मर्दानी दसरा सोहळ्याला आज सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला.

जेजुरीत मर्दानी दस:याला प्रारंभ
>जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथील जगप्रसिद्ध मर्दानी दसरा सोहळ्याला आज सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाचा पालखी सोहळा देवाचा जयघोष आणि भंडारा-खोब:याच्या उधळणीत सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर पडला.
आज सकाळी धार्मिक विधी पूर्ण करत जेजुरी गडावरील बालदारीतील देवाचे घट उठवण्यात आले. मुख्य मंदिरात महापूजा, अभिषेक, गड पूजनाबरोबरच तलवार व ध्वज पूजन विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता देवाचे मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे व शामकाका पेशवे यांनी आदेश देवून सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली.
उत्सव मूर्तींना पालखीत ठेवताच संपूर्ण गड कोट देवाच्या जयघोषाने दणाणून गेला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’च्या गजरात भाविकांनी भंडार खोब-याची उधळण केली. भक्तीमय वातावरणात शुक्रवारी खंडेरायाची जेजुरी नगरी भंडा:याच्या उधळणीने पिवळी
झाली होती. (वार्ताहर)
4निशाण, आबदागिरी, चौघडा आणि सनईच्या सुरात सोहळ्याने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून गडकोटाबाहेर सीमोल्लंघनासाठी निघाला. दरम्यान, रात्री 9 वाजता कडेपठार मंदिरातील देवाच्या पालखी सोहळ्यानेही देवभेटीसाठी कूच केले.
4दोन्ही पालख्यांसमोर हवाई फटाक्यांची आतषबाजी होत होती. संपूर्ण गाव या सोहळ्यात सामील झाला होता.
4रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास रमणा परिसरात देवभेटीचा सोहळा होणार असल्याने परिसरातील भाविक हा डोंगरद:यांतील मर्दानी सोहळा पाहण्यासाठी येथे आले होते.