शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पुरुष दिन विशेष : ‘त्या’चे कणखर हात ‘ति’चे सौंदर्य खुलवतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:32 IST

मेकअप आर्ट क्षेत्रात पुरुषांची चलती 

ठळक मुद्दे लग्न समारंभ, फॅशन शो किंवा फोटोशूटसाठी मेकअप करण्याचे आव्हानही पेलले लीलयापार

पुणे : हे क्षेत्र स्त्रीचं ... ते क्षेत्र पुरुषांचं.. या पारंपरिक विचारांच्या पगड्यातून बाहेर येत आता तरुण नवनव्या करिअरमध्ये उतरत आहेत. त्यातलंच एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे रंगभूषा किंवा मेकअप आर्टिस्ट. तसं मागील अनेक वर्षांपासून चित्रपट आणि नाट्यसृष्टीत पुरुषच वेशभूषा आणि केशभूषा करीत असत; पण आता त्याही पलीकडे जाऊन लग्न समारंभ, फॅशन शो किंवा फोटोशूटसाठी मेकअप करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले आणि तिचे ‘सौंदर्य’ही खुलवले आहे.काही वर्षांपूर्वी घरातल्या मुलाला या क्षेत्रात करिअर करायचे आणि त्याकरिताचे शिक्षण घ्यायचे म्हटल्यावर विरोध व्हायचा. ‘पुरुषासारखा पुरुष तू, काहीतरी मदार्सारखं काम कर’ वगैरेपण बोललं जायचं. पण, हळूहळू हा विरोध मावळताना दिसत आहे.मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर विशाल पाटील म्हणतात, ‘‘मी ८ वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. फक्त पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये नाही, तर आता लहान गावांमध्येही मी ब्रायडल मेकअप करतो. सुरुवातीला काहीशा संकोचानं विचारणाºया मुली आता खूप बदलल्या आहेत. इतकंच नव्हे तर मुलीची आई, काकूही आमच्याकडून मेकअप करून घेतात.’’ याच क्षेत्रात काम करणारे मयांक बंदे सांगतात, ‘‘सुरुवातीला आम्ही फोटो दाखवून आणि ओळखीने कामं मिळवली; पण एकदा आर्टिस्टला काम आवडलं, की तो स्वत:हून पुन्हा बोलावतो आणि कामातून कामं वाढत जातात, असा माझा अनुभव आहे.’’ शेवटी कलाकारही कोणत्याही लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन त्याची कला प्रस्तुत करीत असतो, हेच या पुरुषांशी बोलताना जाणवते..........मला सुरुवातीपासून या क्षेत्राची आवड होती. माझ्या आईचे ब्यूटी पार्लर असल्याने मलाही घरातून फारसा विरोध झाला नाही. मला ते अधिक महत्वाचं वाटतं. आजही अनेक मुलांना या क्षेत्राची आवड असतानाही ते घरच्यांच्या दबावापोटी इतर क्षेत्रात करिअर करतात. तिथे ते खुलतही नाहीत. त्यामुळे लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिकतेच्या दृष्टीने करिअर निवडले, तर बेरोजगारीसारखे प्रश्न सुटू शकतात.- मयांक बंदे, हेअर ड्रेसर आणि मेकअप आर्टिस्ट  ........सुरुवातीला बिचकत येणाºया मुलींच्या सगळ्या शंकांचं मी निरसन करायचो. मी फक्त मेकअप आणि हेअर ड्रेसिंग करतो. साडी किंवा घागरा ड्रेपिंगला महिला सहायक असते, असं सांगितल्यावर त्या निर्धास्त होत. आता असे प्रश्न न विचारता मुली बिनधास्तपणे त्यांच्या मेकअप डीमांड सांगतात. हा बदल महत्त्वाचा असून त्यांचा विश्वास आम्हाला समाधान देणारा असतो. - विशाल प्रकाश पाटील, मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर  

टॅग्स :PuneपुणेartकलाMakeup Tipsमेकअप टिप्सmarriageलग्नWomenमहिला