पर्वणीच्या आठवणी मोबाइलमध्ये कैद

By Admin | Updated: August 30, 2015 02:48 IST2015-08-30T02:48:20+5:302015-08-30T02:48:20+5:30

बारा वर्षांनंतर येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी नाशिककरांसह बाहेरून आलेल्या भाविकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केल्या. मिरवणुकीत सजविण्यात आलेले

Memories of the Moment Capture in Mobile | पर्वणीच्या आठवणी मोबाइलमध्ये कैद

पर्वणीच्या आठवणी मोबाइलमध्ये कैद

नाशिक : बारा वर्षांनंतर येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी नाशिककरांसह बाहेरून आलेल्या भाविकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केल्या. मिरवणुकीत सजविण्यात आलेले रथ, तसेच साधूंचे शस्त्र प्रदर्शन मोबाइलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांचे हात सरसावत होते.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने बऱ्याचशा नागरिकांना प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभागी होता आले नाही. त्यामुळे मिळेल त्याठिकाणावरून नागरिक मोबाइलमध्ये मिरवणुकीचे छायाचित्र टिपत होते. तर मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक आपल्या सहकार्यांकडे मोबाइल सोपवून स्वत:चे छायाचित्र काढण्यात दंग होते. यामध्ये साधू-महंतदेखील मागे नव्हते. आपल्या भक्तांना स्मार्टफोनमध्ये स्वत:ची छबी टिपण्यासाठी सांगत होते. तसेच भक्तीचा हा अलोट सागर मोबाइलमध्ये टिपण्यासाठी स्वत: महंत स्मार्टफोन हाताळताना बघावयास मिळत होते. शाहीस्नानानंतर तर साधू-महंतांसोबत छायाचित्र काढण्यासाठी भाविकांची एकच गर्दी होत होती. काही विदेशी पर्यटकदेखील हा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर पालकमंत्री, महापौर, माजी उपमुख्यमंत्री यांच्यासह नगरसेवकांनी देखील पर्वणीत छायाचित्र टिपण्याचा आनंद घेतला.

Web Title: Memories of the Moment Capture in Mobile