‘आधुनिक वाल्मीकीं’च्या आठवणींना उजाळा...
By Admin | Updated: October 8, 2015 01:40 IST2015-10-08T01:40:37+5:302015-10-08T01:40:37+5:30
मराठी मनाच्या अंतरंगात रुंजी घालणाऱ्या कविता, गीते सादर करून, कवी, साहित्य प्रतिभेचे श्रेष्ठत्व आणि कलासंस्कृती समृद्ध

‘आधुनिक वाल्मीकीं’च्या आठवणींना उजाळा...
पिंपरी : मराठी मनाच्या अंतरंगात रुंजी घालणाऱ्या कविता, गीते सादर
करून, कवी, साहित्य प्रतिभेचे
श्रेष्ठत्व आणि कलासंस्कृती समृद्ध करणाऱ्या आठवणी सांगत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अर्थात गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांना शब्दसुमनांजली अर्पण केली. गदिमा कविता महोत्सवातून शब्दप्रभूंच्या आठवणींना बुधवारी उजाळा देण्यात आला.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी वतीने आयोजित केलेल्या २०व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य होत्या. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, गदिमा प्रतिष्ठानाचे मुख्य विश्वस्त श्रीधर माडगूळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गदिमा काव्य महोत्सवात राज्यभरातील प्रतिभावान कविता, विविध विषयांवरील कविता
सादर करून सामाजिक भान दिले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाकवीचे श्रेष्ठत्व रसिकांना सांगितले.
अध्यक्षीय भाषणात वैद्य यांनी गदिमांना शब्दसुमनांजली अर्पण
केली. कुसुमाग्रजांची ‘ओळखलंत
का सर मला...’ ही कविता
सादर केली.
पुरस्कारार्थींची नावे :
गदिमा काव्यगौरव पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे, जीवनगौरव पुरस्कार मधुकर भावे, काव्यप्रतिभा पुरस्कार अनिल कांबळे, अरुण शेवते, गदिमा साहित्य पुरस्कार जळगावच्या डॉ. अस्मिता गुरव, गणेश मरकड (अहमदनगर), प्रा. रेखा कोरे (रायगड), विष्णू थोरे (नाशिक), आबासाहेब पाटील (बेळगाव), स्नेहबंध पुरस्कार डॉ. विलास साबळे, उद्योजक विकास पुरस्कार परशुराम बोऱ्हाडे, संस्कारक्षम शाळा पुरस्कार श्रीराम विद्या मंदिर भोसरी, श्रमजीवी विद्यालय भोसरी, मृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत येळेगावकर, आनंद पिंपळकर यांना प्रदान करण्यात आला. तर गदिमांचे वारसदार म्हणून रेणू पाचपोर (परभणी), माधव पवार (सोलापूर), लता कदम (सांगली), चंद्रकांत वानखेडे (सिंहगड), अनुजा कल्याणकर (पुणे), अस्मिता चांदणे (भोसरी), दीपेश सुराणा (पिंपरी), डॉ. भीम गायकवाड (पुणे)