‘विक्रांत’चे स्मारक होणार

By Admin | Updated: June 30, 2015 03:13 IST2015-06-30T03:13:36+5:302015-06-30T03:13:36+5:30

देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वरील सामुग्रीतून दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ लायन प्रवेशद्वारासमोरील वाहतूक बेटावर धातुशिल्परूपी स्मारक

Memorial of 'Vikrant' will be held | ‘विक्रांत’चे स्मारक होणार

‘विक्रांत’चे स्मारक होणार

मुंबई : देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वरील सामुग्रीतून दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ लायन प्रवेशद्वारासमोरील वाहतूक बेटावर धातुशिल्परूपी स्मारक उभारण्यास महापालिका गटनेत्यांच्या सभेने मंजुरी दिली आहे.
स्मारकासंदर्भातील पत्र त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांना लिहिले होते. हा विषय गटनेत्यांच्या सभेपुढे मांडत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती फणसे यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना केली. यावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची संयुक्त बैठक महापौर दालनात सोमवारी झाली. या बैठकीत यासंदर्भातील मान्यता देण्यात आली.
विक्रांत युद्धनौकेवर पायलट म्हणून सेवेत असताना भादा यांनी १९७१च्या बांगलादेश युद्धातही याच नौकेवरून कामगिरी बजावली होती. विक्रांत दारुखाना स्कॅ्रप यार्डमध्ये मोडीत निघाली, त्या वेळी भादा यांनी नौकेवरील सुमारे दोन टन सामुग्री विकत घेतली. अर्झान खंबाटा यांनी मुंबईत अनेक देखणी धातुशिल्पे साकारली आहेत. विक्रांतवरील सामुग्रीतून नौदलाच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालय परिसरात देखणे शिल्प साकारण्याची त्यांची तयारी आहे. त्याकरिता त्यांनी चार पसंतीची स्थळे सुचविली असून शिल्प उभारणीचा खर्चही कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तत्त्वाच्या प्रायोजकत्वातून भागविण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. वाहतूक बेट निश्चितीला मान्यता देणे आणि महापालिकेच्या पातळीवरील बाबींना आवश्यक ते सहकार्य करणे, याकरिता त्यांनी महापालिकेकडे विनंती केली आहे.
भादा आणि खंबाटा यांचा पुढाकार लक्षात घेता आणि विक्रांत नौकेची कामगिरी व इतिहासातील तिचे स्थान पाहता महापालिकेने त्यांना आवश्यक त्या सर्व परवानग्या प्रदान कराव्यात, अशी विनंती फणसे यांनी केली. सभेने या विनंतीला एकमताने मान्यता दिली. (प्रतिनिधी)

आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरील सुमारे २ टन सामुग्री नौदलातून सेवानिवृत्त कमोडोर एम. भादा यांनी विकत घेतली आहे. नामवंत धातू शिल्पकार अर्झान खंबाटा यांच्या सहकार्याने सामुग्रीतून नौदलाच्या मुख्यालयाजवळ वाहतूक बेटावर देखणे स्मारक उभारण्याचा भादा यांचा मानस आहे.

Web Title: Memorial of 'Vikrant' will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.