शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

‘व्हिजिट महाराष्ट्र’, एमटीडीसी व ओला यांच्यामध्ये सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 12:13 IST

मुंबईतील पर्यटन व्यवसायाला चालना देणे तसेच मुंबईत येणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आश्वासित, सुरक्षित आणि खात्रीची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन देणं मुख्य उद्देश असणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईतील पर्यटन व्यवसायाला चालना देणे तसेच मुंबईत येणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आश्वासित, सुरक्षित आणि खात्रीची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व ओला ही खाजगी टॅक्सी कंपनी यांच्यामध्ये पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते ओला टॅक्सीला झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला.  
 
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर - सिंह, ओला कंपनीचे संस्थापक भागीदार प्रणय जिवाराजका, पर्यटन विभागाचे उपसचिव श्री. दळवी, एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
2017 हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून जाहीर केले आहे. यासाठी पर्यटन विभागाने महाराष्ट्र पर्यटन हे एक ब्रँड म्हणून प्रस्थापित व्हावे यासाठी अनेक उपायोजना राबवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला. यात ओला कंपनीमार्फत `मुंबई दर्शन" हा एक वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रेंटल सेवेअंतर्गत याचा समावेश करण्यात आलेला आहे, याद्वारे मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांना शहराच्या पर्यटनाचे मार्गदर्शन पुरवले जाणार आहे. 10 तास किंवा 100 किमी अशा प्रकारच्या पॅकेजमध्ये मुंबईतील 10 प्रमुख ठिकाणांना भेट दिली जाईल. यात जुहू बीच, मन्नत बंगला, हाजी अली, मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिराबरोबरच इतर ठिकाणांचा समावेश असेल.
 
मंत्री श्री. रावल यावेळी म्हणाले की, पर्यटकांना साखळी किंवा एकत्रित (integrated) पद्धतीने सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसी प्रयत्नरत आहे. पर्यटक मुंबईत आल्यापासून त्यांना वाहतूक सुविधा, गाईड, पर्यटन स्थळे, शॉपिंगची स्थळे, निवास व्यवस्था, रेस्टॉरंट अशा सर्व सुविधा खात्रीशीर, सुरक्षित आणि आश्वासित पद्धतीने मिळाव्यात यासाठी एमटीडीसी प्रयत्नरत आहे. यासाठी या सर्वच क्षेत्रातील व्यावसायीक, तज्ज्ञ यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओला कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. प्राथमिक टप्प्यात मुंबईत ही सुविधा सुरु करण्यात आली असून लवकरच राज्यभरात त्याचा विस्तार करण्यात येईल. याशिवाय सध्या मुंबईत १०० तरुणांना तर उर्वरीत महाराष्ट्रात ४०० तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याद्वारे या तरुणांनाही रोजगार उपलब्ध होणार असून हे तरुण लवकरच पर्यटन सेवेत दाखल होतील. राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे यासाठी सहकार्य घेण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली.    
 
पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर - सिंह यावेळी म्हणाल्या की, ‘पर्यटनाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नरत आहे. राज्याला स्मार्ट पर्यटन हबमध्ये परिवर्तित करण्याचे पर्यटन विभागाचे ध्येय असून याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना ओला तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे.