शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंबा एक्सप्रेसच्या कोचवर रेखाटणार मेळघाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:57 IST

अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे.

- अनिल कडू परतवाडा (अमरावती)  - अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी या अनषंगाने रेल्वे प्रशासनाला परवानगी मागितली आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत आपली सकारात्मकता दर्शविली आहे. याकरिता अंबा एक्सप्रेसचे डब्बे बदलण्याची वाट बघितली जात आहे. प्राप्त माहितीनुसार येग्या काही दिवसांत अमरावती-मुंबई अंबा एक्सप्रेसचे सध्याचे डब्बे बदलणार आहेत. त्या ऐवजी लाल रंगाचे नवीन डब्बे लावण्यात येणार आहेत.या नवीन डब्ब्यांपैकी दोन एसी कोचवर मेळघाटातील वन आणि वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य व पर्यटन पेंटींगच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. याचा संपूर्ण खर्च मेळघाट व्याघ्र प्रकल्प उचलणार आहे. दरम्यान शेगाव रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणाची परवानगीही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मिळविली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अभयारण्यातील वन वन्यजीवांची माहिती, वनांचे महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन विषयक महत्त्वपूर्ण माहितीची पेंटींग शेगाव रेल्वे स्टेशनच्या भिंती व प्लॅटफार्मवर साकारली जाणार आहे. आकर्षक रंगसंगतीतील पेंटींगमुळे बिबट, फुलपाखरू, हरिण, गवा, सांबर, नैसर्गिक सौंदर्यासह अन्य वन्यजीव व वन यात्रेकरूंना, प्रवाशांना शेगाव रेल्वे स्टेशनवर बघायला मिळणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या बोलक्या भिंती व प्लॅटफार्म पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

काटेपूर्णा, ज्ञानगंगा अभयारण्याचाही उल्लेखमेळघाट व्याघ्र प्रकल्पाची ओळख, तेथील लोकजीवनवन व वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य देशभरात पोहचविण्याच्या क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या प्रयत्नात अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे योगदान आहे. अमरावती-बडनेरा  अकोल्यानंतर आता शेगाव रेल्वे स्टेशनवर मेळघाट रेखाटले जात आहे. या पेंटींगमध्ये काटेपूर्णा व ज्ञानगंगा अभयारण्याचाही उल्लेख राहील, असे रेल्वे प्राशासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद आहे. 

व्यावसायिक वापर होणार नाहीरेल्वे प्रशासनाने क्षेत्रसंचालकांच्या प्रस्तावास मान्यता देताना याची मालकी व्याघ्र प्रकल्पाची राहणार नाही. याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर करता येणार नाही आणि सर्व खर्च व्याघ्र प्रकल्पाला करावा लागेल, अशी घातली घातलेली आहे.

टॅग्स :MelghatमेळघाटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र