शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात व्याघ्र गणना अडचणीत, वनकर्मचारी संपाचा फटका; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:51 IST

देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यजीवांचे अधिवास व संख्या निश्चितीसाठी प्रगणना २० ते २७ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. परंतु...

अमरावती : देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून राबविण्यात आली. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जीपीएस यंत्रणेअभावी व्याघ्र गणना अडचणीत आली. त्यामुळे आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रगणना नव्याने होणार असली तरी यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यजीवांचे अधिवास व संख्या निश्चितीसाठी प्रगणना २० ते २७ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील वनकर्मचा-यांनी वेतनवाढीचा मुद्दा आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकून जीपीएस मोबाईल यंत्र हाताळण्यास नकार दिला. त्यानंतर १९ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले. यात अकोट वन्यजीव विभागातील तीन वनकर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले, हे निलंबन मागे घेण्यासाठी २४ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ केला ते आजतागायत कायम आहे.  दुसरीकडे वनपाल, वनरक्षकांनी जीपीएस हाताळण्यास नकार दिल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वन्यजीव प्रगणना होऊ शकली नाही. वनकर्मचा-यांच्या आंदोलनाचा परिणाम वन्यजीव प्रगणनेवर झाला असून मेळघाटात नेमकी वाघांची संख्या किती? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. सन २०१३ नंतर तब्बल चार वर्षांनी झालेली वन्यजीव प्रगणना मेळघाटात सुरळीत राबविता आली नाही. त्यामुळे वन्यजीव प्रगणनेचा अहवाल राज्याच्या प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंत सादर करावयाचा असल्याने तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिका-यांना सादर होऊ शकला नाही.पेंच, ताडोब्यात झाली व्याघ्र गणना -देशभरातील ५२ व्याघ्र प्रकल्पांशिवाय प्रादेशिक वनविभाग, वनविकास मंडळांच्या जंगलातसुद्धा प्राणी प्रगणना राबविण्याचा निर्णय राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने घेतला होता. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प वगळता राज्यात पेंच, ताडोबा-अंधारी, सह्याद्री, बोर, नवेगाव- नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांत कशीबसी आटोपली. परंतु कर्मचारी वेतनवाढ आणि जीपीएसच्या मुद्दावरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव प्रगणना पूर्ण झालीच नाही.       काय आहे जीपीएस यंत्र? जीपीएस यंत्राद्वारे जंगलातील अचूक लोकेशन वनाधिका-यांना बसल्या जागी मिळविता येते. वनकर्मचारी नेमके कोठे, कसे कर्तव्य बजातात, हे सुद्धा क्षणात कळते. वन्यजीवांचे अधिवासाची माहिती रेखांशवरून सिद्ध करता येते. सर्वेक्षण आणि कर्तव्यात चूक असू नये, यासाठी जीपीएस महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.   ‘‘वनकर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम व्याघ्र गणनेवर झाला आहे. एनटीसीएच्या निर्देशानुसार पुन्हा नव्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रगणना केली जाईल.       - विशाल  माळी,      उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल

टॅग्स :TigerवाघMelghatमेळघाटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प