मेहंदी रेखाटनात विक्रमाला गवसणी!
By Admin | Updated: December 28, 2014 01:39 IST2014-12-28T01:39:19+5:302014-12-28T01:39:19+5:30
प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने शनिवारी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी तब्बल ७४ तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला.

मेहंदी रेखाटनात विक्रमाला गवसणी!
गिनीज बुक आॅफ रेकॉर्डकडे प्रस्ताव : प्रिया सुरडकरने सलग ७४ तास काढली मेहंदी
जालना : येथील प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने शनिवारी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी तब्बल ७४ तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला. शेकडो जालनेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रियाने जुना विक्रम मोडीत काढला. प्रियाने ३०० महिलांच्या हातावर सुंदर व वेगवेगळ्या डिझाईनचे मेहंदी रेखाटन केले. दरम्यान, आपण १०० तास पूर्ण करणार असल्याचा मानस तिने लोकमतशी बोलताना व्यक्त केला़
प्रियाने २४ डिसेंबर रोजी दुपारी मेहंदी रेखाटन सुरु केले होते. शनिवार सकाळपासूनच विक्रम होणार असल्याने अनेकांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात गर्दी केली होती. शनिवारी रात्री तज्ज्ञ प्रशिक्षक, वकील व साक्षीदार यांच्या उपस्थितीत हा विक्रम नोंदविण्यात आला.
बेटी बचावचा संदेश : समाजात स्त्रीभू्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे. समाजामध्ये बेटी बचावचा संदेश सर्वदूर जावा या हेतूनेच विक्रम करण्यासाठी बसले होते. यातून मी हजारो महिलांना बेटी बचावचा संदेश दिला आहे. थोडा थकवा आला असला तरी शंभर तास पूर्ण करणारच, असा ठाम विश्वास प्रियाने व्यक्त केला.
पूर्वीचा विक्रम ७३ तासांचा : मेहंदी रेखाटण्याचा विश्वविक्रम नागपूर येथील सुनीता धोटे हिच्या नावावर आहे. तिने ७ ते १० जानेवारी २०१४ दरम्यान ७३ तास ५५ मिनिट मेहंदी रेखाटली होती.
जालन्याचा तिसरा विश्व विक्रम : जालना जिल्ह्णासाठी ही अभिमानाची बाब असून प्रियाच्या रुपाने तिसरा विश्व विक्रम नोंदविण्यात आला. यापूर्वी २००७ साली प्रसिद्ध तबला वादक प्रसाद चौधरी यांनी सलग ४८ तास तबला वादन केले होते. तर प्रकाश कोंका यांनी ७६ हजार ६७० स्क्ेवअर फूट रांगोळी काढून विश्व विक्रम केला.
तपशील गिनीज बुककडे पाठविणार
याविषयी प्रा. प्रकाश कोंका म्हणाले, प्रिया सुरडकरचा मेहंदी रेखाटनाचा सर्व तपशील लंडनस्थित गिनीज बुक आॅर्फ वर्ल्ड रेकॉर्ड कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण तपासणीअंती तिला विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.