मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

By Admin | Updated: June 10, 2014 08:57 IST2014-06-10T02:02:58+5:302014-06-10T08:57:19+5:30

राजीनामा पत्रसोबत पाठविलेल्या निवेदनातून मेघे यांनी आपली व्यथा मांडली आहे.

Megha's father-son's Congress RR Ram | मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

>वर्धा : माजी खासदार दत्ता मेघे यांनी पुत्र माजी आमदार सागर व समीर यांच्यासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोमवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्यासह जिल्हाध्यक्षांकडेही पाठविला आहे. 5 जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. राजीनामा पत्रसोबत पाठविलेल्या निवेदनातून मेघे यांनी आपली व्यथा मांडली आहे. दरम्यान, माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, मेघे सत्ता मिळेल तिकडे जाण्याचा निर्णय घेत असतील तर असे लोक पक्षात नसलेले बरे.

Web Title: Megha's father-son's Congress RR Ram