गिरणी कामगारांच्या घरांसाठी मेगाआॅफर
By Admin | Updated: May 15, 2015 04:45 IST2015-05-15T04:45:41+5:302015-05-15T04:45:41+5:30
गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी विकसक पुढे यावेत आणि कामगारांना थोडी मोठी घरे मिळावीत, या दुहेरी उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मेगाआॅफर
मुंबई : गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी विकसक पुढे यावेत आणि कामगारांना थोडी मोठी घरे मिळावीत, या दुहेरी उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फंजिबल एफएसआयवर यापुढे प्रीमियम न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
हा प्रीमियम द्यावा लागत असल्याने गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे कारण अनेकदा दिले जात होते. मुंबई विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत गिरणी कामगारांच्या घरांच्या उभारणीबाबतची नियमावली सप्टेंबर २०१० मध्ये राज्य शासनाने निश्चित केली होती. हा प्रीमियम रद्द केला तर घरे बांधण्यासाठी विकसक मोठ्या प्रमाणात पुढे येतील आणि गिरणी कामगारांनाही थोडी मोठी घरे मिळतील.(विशेष प्रतिनिधी)