मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक
By Admin | Updated: February 12, 2017 04:27 IST2017-02-12T04:27:50+5:302017-02-12T04:27:50+5:30
मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे-कल्याण डाउन धिम्या, तर हार्बरवर सीएसटीएम ते चुनाभट्टी/ माहीमदरम्यान अपडाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक
डोंबिवली : मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे-कल्याण डाउन धिम्या, तर हार्बरवर सीएसटीएम ते चुनाभट्टी/ माहीमदरम्यान अपडाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळेत डाउन धिम्या मार्गावरील लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे त्या स्थानकांअभावी कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्थानकांत थांबणार नाहीत. तर हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसटीएम-पनवेल अप-डाउन यादरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बरच्या प्रवाशांना मुख्य मार्ग व पश्चिम मार्गावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवासाची मुभा असेल, असे रेल्वेने कळवले आहे. (प्रतिनिधी)