आज मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 04:53 IST2017-05-07T04:53:21+5:302017-05-07T04:53:21+5:30
रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेन लाइनवरील

आज मेगाब्लॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेन लाइनवरील माटुंगा ते मुलुंड डाऊन फास्ट मार्गावर सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ आणि हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी/ वांद्रे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. यामुळे लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.
मेन लाइनवरील सीएसटी येथून सुटणारी डाउन फास्ट लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान स्लो मार्गावर चालवण्यात येणार असून, या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. यामुळे मेन लाइनवरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे उशिराने अपेक्षित आहेत.
हार्बर मार्गावर सकाळी ११.२१ ते दुपारी ४.३९ यादरम्यान सीएसटीहून वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर सीएसटीहून सकाळी १०.३८ आणि दुपारी ४.४३ वाजेदरम्यान वांद्रे, अंधेरीकडे धावणाऱ्या लोकलही काही काळ रद्द केल्या आहेत. पनवेल, वाशी, बेलापूरहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ९.५२ ते ३.२६ वाजेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा आहे.