आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 01:09 IST2017-06-11T01:09:06+5:302017-06-11T01:09:06+5:30

उपनगरीय रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वेमार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर

Mega Blocks on all three railroad tracks today | आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उपनगरीय रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वेमार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरही मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे.
मध्य मार्गावर मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावरून चालविण्यात येतील. परिणामी, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत लोकलला थांबा देण्यात येणार असल्यामुळे या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ९.५२ ते दुपारी ४.३९ वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टीदरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. त्याचबरोबर सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा सकाळी १०.३८ ते दुपारी ४.१३ वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरून विशेष पनवेल लोकल धावतील.

पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, अप-डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीत. जम्बोब्लॉकमुळे पश्चिम मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Mega Blocks on all three railroad tracks today